Testimonials

नव्याने सुरू होत असलेले आर. के. विधी महाविद्यालयदेखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विविध स्तरातील समाजातील विद्यार्थ्यांना संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमांचा लाभ होत आहे ही समाधानाची बाब आहे) संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्ताने संस्थापक श्री रमेश खानविलकर यांच्या जीवनावरील वादळवाट या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती ‘The stormy path’ प्रकाशित होत असल्याचेही समजले. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांना हे पुस्तक प्रेरणादायी ठरेल असे, वाटते. या पुस्तकाच्या प्रकाशनास तसेच संस्थेच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!

ईशान्य मुंबईतील विद्यार्थी संख्या व लोकसंख्या विचारात घेता येते. नवीन लॉ कॉलेज असावे म्हणून शिक्षण तज्ञ रमेश खानविलकर गेली दोन वर्ष सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश प्राप्त झाले, त्यामुळे ईशान्य मुंबईने शैक्षणिक क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. प्रामाणिकपणे, मेहनत व सातत्याने कष्ट केले की सर्व काही साध्य करता येते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे “सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ” त्यांनी लॉ. कॉलेजच्या माध्यमातून घेतलेल्या उंच भरारीला माझ्या हार्दिक शुभेच्छा व सर्वांचे अभिनंदन!

भांडुप मधील सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाच्या आर. के. लॉ कॉलेजला शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून भारतीय विधीज्ञ परिषद तसेच मुंबई विद्यापीठाची संलग्नता मिळाल्याचे समजून आनंद झाला.
श्री. रमेश खानविलकर यांनी १९९५ मध्ये सुरू केलेल्या शैक्षणिक संस्थेचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत असून विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण व्यवस्था देण्याचा संस्थेचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

आपल्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातुन गोर-गरिब, दलित, आदिवासी, मागासवर्गीय तसेच इतर तळागाळातील होतकरु वर्गाला याचा सुयोग्य लाभ घेता येईल. पुनःश्च सिध्दीविनायक शिक्षण प्रसारक मंडळाच्या पुढील कारकीर्दीस माझ्या शुभेच्छा !

सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाच्या आर. के. विधी महाविद्यालयास बार कौन्सिल ऑफ इंडिया, महाराष्ट्र शासन व मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून मान्यता, परवानगी, संलग्नता मिळालेली आहे त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन !!

गेली ३० वर्षात शैक्षणिक क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थापक संचालक श्री. रमेश खानविलकर यांनी १९९५ साली सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून खिंडीपाडा सारख्या आदिवासी भागात प्राथमिक शाळा सुरू केली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, व्यावसायिक अभ्यासक्रमाचे महाविद्यालय यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ अभ्यास केंद्र, करत करत उत्तुंग भरारी घेत सन २०२५ मध्ये आर. के. विधी महाविद्यालय सुरू होत आहे. ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे.
शिक्षण तज्ज्ञ श्री. रमेश खानविलकर आणि कुटुंबीयांनी सातत्याने ३० वर्षे कठोर मेहनतीने हा शिक्षणाचा वटवृक्ष उभा केला आहे. ज्याची सावली आज अनेकजण घेत आहेत, हा वटवृक्ष असा बहरत राहो, ही सदिच्छा व सर्वांचे अभिनंदन।

कोणतीही संस्था म्हणजे केवळ इमारतींचा संच नाही, तर ती एका विचारसरणीची, संस्कारांची आणि सामाजिक परिवर्तनाची जिवंत प्रयोगशाळा असते. सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेने गेल्या काही दशकांत या प्रयोगशाळेतील निखळ तपश्चर्या जपली आहे.
या संस्थेची वाटचाल म्हणजे विद्या, मूल्य आणि सामाजिक दायित्व यांचा एक त्रिवेणी संगम आहे. समाजातील वंचित, दुर्बल घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात सामावून घेण्याचे त्यांचे कार्य ही केवळ सेवा नाही, तर ती भारतीय लोकशाहीच्या खऱ्या अर्थाने जागवलेली मूल्यदृष्टी आहे.
या सर्व कार्याला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. अशी माणसं, अशा संस्था जर अधिक बळकट झाल्या, तर आपले राज्य आणि समाज अधिक सजग, सुसंस्कृत आणि विवेकशील होण्यास मदतच होईल.

(गेली ३० वर्षात शैक्षणिक क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थापक संचालक रमेश खानविलकर यांनी १९९५ साली सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून खिंडीपाडासारख्या आदिवासी भागात प्राथमिक शाळा सुरू केली त्यानंतर टप्प्याटप्प्याने माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, व्यावसायिक अभ्यासक्रमाचे महाविद्यालय यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ अभ्यास केंद्र, करत करत उत्तुंग भरारी घेत सन २०२५ मध्ये आर. के. विधी महाविद्यालय सुरू होत आहे, ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे.
(एखादी शैक्षणिक संस्था सुरू करणे सोपे असते, पण ती वाढविणे व तिच्यात वेळोवेळी सातत्याने बदल करणे, जागा घेणे, इमारत बांधणे, आर्थिक बाबी निर्माण करणे अत्यंत कष्टकारक अशी बाब आहे. त्याकरिता अहोरात्र मेहनत घ्यावी लागते.
शिक्षण तज्ञ रमेश खानविलकर आणि कुटुंबीयांनी सातत्याने तीस वर्ष कठोर मेहनतीने हा ‘शिक्षणाचा वटवृक्ष’ उभा केला आहे. ज्याची सावली आज अनेकजण घेत आहेत, हा वटवृक्ष असा बहरत राहो ही सदिच्छा व सर्वांचे अभिनंदन !

मुंबईच्या भांडुप येथील सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाच्या आर. के. लॉ कॉलेजला शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून भारतीय विधीज्ञ परिषद तसेच मुंबई विद्यापीठाची संलग्नता मिळाल्याचे समजून आनंद झाला.
श्री. रमेश खानविलकर यांनी १९९५ मध्ये सुरू केलेल्या शैक्षणिक संस्थेचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत असून विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण व्यवस्था देण्याचा संस्थेचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

कोकण भूमितील सुपूत्र व शिक्षणतज्ज्ञ श्री. रमेश खानविलकर यांनी १९९५ मध्ये स्थापन केलेल्या सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ भांडुप (प.) मुंबई या संस्थेला सन २०२५-२०२६ पासून आर. के. विधी महाविद्यालय सुरू करण्यास बार. कौन्सिल ऑफ इंडिया, महाराष्ट्र शासन व मुंबई विद्यापीठाने मान्यता दिल्याचे वाचून मला आनंद झाला.
मुंबईतील भांडुप या प्रती कोकण उपनगरातील जनतेसाठी श्री. रमेश खानविलकर यांनी मागील तीस वर्ष मुंबई येथे शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनिय असे कार्य केले. त्याचा उपयोग कोकणातील व पर्यायाने मुंबईतील सर्वच क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात झाला आहे
त्यांच्या सिध्दीविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आर. के. विधी महाविद्यालयामार्फत जागतिक दर्जाचे विधीज्ञ निर्माण होवो अशी सदिच्छा व्यक्त.
Notice
Important Links






















About us
30 Years of Growth
in Education
Welcome to RK Law College, an esteemed institution under the auspices of Siddhivinayak Shikshan Prasarak Mandal, dedicated to excellence in legal education. With a profound commitment to nurturing future legal professionals, RK Law College stands as a beacon of knowledge, integrity, and academic rigor. Our journey of 30 years exemplifies a steadfast dedication to empowering students with comprehensive education and practical skills, preparing them to navigate and excel in the dynamic field of law.
Over the past three decades, we have evolved into a hub of academic innovation, fostering a culture that values critical thinking, ethical practice, and community engagement. Our distinguished faculty, modern infrastructure, and a curriculum aligned with contemporary legal challenges ensure that students receive not just a degree, but a transformative educational experience. At RK Law College, we believe in shaping not only capable lawyers but also responsible citizens who contribute meaningfully to society and uphold the principles of justice.
WHY CHOOSE US
How we Help of Students to
Grow and Successful
TECHNOLOGY
We have structured education through modern education system. In this, we try to provide high level knowledge to student.
DEVELOPMENT
Every student is equally important to us, so we regularly strive to pave the way for a bright future for student who studies in RK Law College.
MANAGEMENT
We have developed a simple management system to deal with the difficulties. Which is of good for student during academic period.
INFRASTRUCTURE
We have also emphasized on providing various infrastructure along with suitable advanced various facilities to the students.
From Chairman's Desk
Mr. Ramesh Khanvilkar
For over three decades, SSPM Institute has steadfastly nurtured countless students into upstanding citizens. Our institution continues to provide a positive and nurturing environment where human values are instilled, shaping young minds into responsible individuals. We take pride in the rich school experiences…
Notice
Admission
Examination
Results
SSPM IS COMMITTED TO
Providing a holistic education that blends Indian heritage with modern learning techniques.
Developing students’ logical, analytical, and ethical skills through a rich curriculum.
Adapting to new academic standards and continuously updating facilities to meet evolving educational needs.
Celebrating 30 years of excellence, demonstrating a longstanding commitment to educational leadership and innovation.
Recent Events
EXCELLENT Based on 27 reviews Posted on Dhanashri SawantTrustindex verifies that the original source of the review is Google. Best college,supportive teachers, helping staff,motivating students for there career.Posted on Soham BhosaleTrustindex verifies that the original source of the review is Google. R.K. Law College offers a good mix of academics and personal growth. The faculty members are supportive and always ready to help students. The campus has a friendly atmosphere and promotes various activities beyond studies. While there’s always room for improvement in areas like placement or infrastructure, overall it’s a great place to learn and build a strong foundation for your career.Posted on Atharva Mulekar 68Trustindex verifies that the original source of the review is Google. Amazing college with excellent faculty, supportive environment, and great infrastructure. The teaching quality is top-notch, and extracurricular activities help in overall development. Proud to be a part of this institution!Posted on Akshay MoreTrustindex verifies that the original source of the review is Google. good colleges and good facilityPosted on Satish PawarTrustindex verifies that the original source of the review is Google. Very good collage and nice staff, supportive teachers and rules and regulations are the best...
General Inquiry

















